बहुउपयोगी भवनाचे लोकार्पण

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र.58, वाशी येथे सेक्टर 14/15 याठिकाणी उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय इमारतीचे लोकार्पण व स्वामी विवेकानंद नामकरण समारंभ नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना महापौर जयवंत सुतार यांनी या बहुउद्देशीय इमारतीतून नागरिकांच्या छोट्या-मोठ्या विविध कार्यक्रमांसाठी एक अद्ययावत सभागृह उपलब्ध होत असून त्यासोबतच नागरी आरोग्य केंद्र, व्यायामशाळा व आंतरक्रीडा प्रकारांसाठी जागा, वाचनालय अशा बहुविध सुविधांचा लाभ नागरिकांना यामधून घेता येणार असल्याची माहिती दिली. या सांस्कृतिक भवनाला स्वामी विवेकानंद यांचे नामकरण करून एक चांगला आदर्श समाजासमोर राहील याबद्दलही महापौरांनी समाधान व्यक्त केले.

वाशी सेक्टर 14/15 मध्ये भूखंड क्र. 42 अ येथे साधारणत: 11 कोटी रक्कम खर्च करून ही 4 मजली भव्यतम बहुउद्देशीय इमारत उभारण्यात आलेली असून तळमजल्यावर चारचाकी 32 वाहनांकरिता वाहनतळ व्यवस्था आहे. तसेच पहिल्या मजल्यावर 2805 चौ.फू. क्षेत्रफळात नागरी आरोग्य केंद्र तसेच 13 चार चाकी वाहनांची वाहनतळ व्यवस्था आहे. दुस-या मजल्यावर 4141.63 चौ.फूटाच्या जागेत व्यायामशाळा व आंतरक्रीडा प्रकारांसाठी जागा उपलब्ध आहे. तिसर्‍या मजल्यावर 4398 चौ.फूटाच्या जागेत वाचनालय असणार  असून चौथ्या मजल्यावर 400 आसन क्षमतेचे अद्ययावत सभागृह आहे. या इमारतीत लिफ्टची सुविधा उपलब्ध आह