पॅन-आधार लिंक न केल्यास 10 हजारांचा दंड

मुंबई : पॅन आणि आधारकार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत आपण पॅन-आधारला लिंक केलं नाही तर खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे आयकर भरताना 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. 

इनकम टॅक्स विभागानं दिलेल्या माहितीनुसार 31 तारखेनंतर जे पॅनकार्ड आधारला लिंक नसतील ते निष्क्रिय करण्यात येतील. निष्क्रिय पॅन वापरणार्‍यांवर 10 हजार रुपयांच्या दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सरकारने पॅन कार्ड आधार बरोबर जोडणं अनिवार्य केले आहे. देशभरात 30.75 कोटींहून जास्त पॅनधारक आहेत. आयकर विभागाकडून अशा नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की, 31 मार्चपर्यंत जर तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नाही केलं, तर पॅन कार्ड संबंधित सर्व काम थांबवण्यात येतील आणि पॅन कार्डदेखील रद्द करण्यात येईल. कारण याआधीही आधार-पॅन लिंक करण्याची तारीख अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. आता आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे, ज्यानंतर तुमचं पॅन कार्ड अन-ऑपरेटिव्ह होईल म्हणजेच तुम्हाला पुढील 27 दिवसात हे काम पूर्ण करावंच लागेल.