Breaking News
गोळ्या झाडलेलं पिस्तुल लागले सीबीआयच्या हाती
मुंबई ः पुण्यात 2013 साली डॉ. नरेंद्र दाभोलकरांची मॉर्निंग वॉकला गेले असता अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तब्बल सात वर्षांनी या प्रकरणी हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तुल सीबीआयच्या हातील लागले आहे. हत्याकरून अरबी समुद्रात फेकलेले पिस्तुल सीबीआयने शोधून काढले आहे.
नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढले. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकार्यांनी ही माहिती दिली आहे. ठाण्याजवळच्या खारेगाव खाडीतून हत्येचं पिस्तुल शोधून काढण्यात आलं आहे. सीबीआयने हे पिस्तुल तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळा अर्थात फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलं आहे. डॉ. दाभोलकर यांची हत्या ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या कोल्हापूरमध्ये फेब्रुवारी 2015 मध्ये झाली. दाभोलकर आणि पानसरे यांच्या निकटवर्तीयांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
2013 पासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दाभोलकरांचे मारेकरी न सापडल्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तपास आता पुढे सरकला असून लवकरच मारेकरी पोलिसांच्या ताब्यात असतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सीबीआयने दाभोलकर हत्येप्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून वीरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे, शरद कळस्कर आणि सचिन अंदुरे यांच्यासह सात जणांना अटक केली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai