राज्यसभेसाठी मोर्चे बांधणी

नवी दिल्ली : राज्यसभेच्या सात जागांसाठी जुगलबंदी सुरु असून संबंधित पक्षांनी आपले उमेदवार ठरवले असून काही उमेदवारांबाबत सस्पेन्स अद्याप कायम आहे. भाजपकडून दोन नावे जाहीर करण्यात आली असून एक नाव अजून जाहीर होणे बाकी आहे. तर चौथ्या जागेवरून महाविकास आघाडीतील तिढाही कायम आहे.

राज्यसभेच्या चौथ्या जागेवरून महाविकास आघाडीतील तिढा कायम आहे. त्यामुळे आज केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच विधानभवनात जाऊन अर्ज दाखल केला. राज्यातील 7 जागांपैकी 4 जागी महाविकास आघाडीचा विजय होऊ शकतो. यातील 2 जागांवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. फौजिया खान यांचं नावही निश्चित झालं आहे.मात्र काँग्रेस चौथ्या जागेवरचा दावा सोडायला तयार नाही. आता आघाडी समन्वय समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आज केवळ पवारांनी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे बहुतांश मंत्री आणि आमदार होते. 

भाजपने महराष्ट्रातून माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रिपइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी दिली आहे. राज्यसभेत भाजपच्या कोट्यात तीन जागा आहे. भाजपकडून दोन नावे जाहीर करण्यात आली असून एक नाव अजून जाहीर होणे बाकी आहे. भाजपचा तिसरा उमेदवार कोण याबाबत अजून सस्पेन्स कायम आहे. भाजपचे निष्ठावंत नेते एकनाथ खडसे यांनी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, भाजपने सध्या महाराष्ट्रातील तीन पैकी दोनच उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. एक नाव अजून महाराष्ट्र कोट्यातून जाहीर होणे बाकी आहे. भाजपचा तिसरा उमेदवार कोण हे अजून सस्पेन्स आहे. 26 मार्च रोजी होणार्‍या या निवडणुकीसाठी 13 मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

भाजपची उमेदवारी यादी

आसाममधून भुवनेश्वर कालीता आणि बुस्वजीत डायमरी, बिहारमधून विवेक ठाकूर, गुजरातमधून अभय भारद्वाज आणि रमीलाबेन बारा, महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले, झारखंडमधून दीपक प्रकाश, मणिपूरमधून लिएसेंबा महाराजा, मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे, राजस्थानातून राजेंद्र गेहलोत या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.