कोरोनाची जगभरात दहशत

भारतात 73 तर महाराष्ट्रात 10  कोरोनाव्हायरस संक्रमित रुग्ण

मुंबई ः कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात दहशत पसरली आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे कोराना बाधित लोकांची संख्या भारतामध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या भारतामध्ये 17 परदेशी नागरिकांसह एकूण 73 लोक कोराना व्हायरसने संक्रमित झाले आहेत.

देशातील 12 राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या केरळमध्ये आढळली आहे. येथे 17 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर महाराष्ट्रात कोरोनाचे 11 रुग्ण आढळले आहेत. यासह उत्तर प्रदेशमध्ये 10 आणि दिल्लीमध्ये 6 केसेस समोर आल्या आहेत.

या सहा लोकांना कोरोना झाल्याचे आढळले होते त्यामधील तीन लोकांनी दुबईमार्गे अमेरिकेचा प्रवास केला होता. यातील चार लोक हे बंगळुरचे, तर दोनजण पुणे येथील आहेत. भारतामध्ये या लोकांच्या संपर्कात आलेल्या 1400 हून अधिक लोकांना आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले आहे. हे 10 जण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, पण ते गंभीर नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनही याच आठवड्यात गुंडाळणार असल्याचंही त्यांनी जाहीर केले. कोरोना व्हायरसबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरसबद्दल राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत लोकांना दक्षता घेण्याचं आवाहन केलं आहे. एक ग्रुप परदेशातून राज्यात आला होता. त्यातून हे 10 रुग्ण आढळले. या ग्रुपमधील व्यक्तींचा  ज्यांच्याशी संबध आला आहे. त्यांच्याही तपासणी सुरू आहे. यात दोन जण मुंबईतील आहे तर 8 जण हे पुण्यातील रुग्ण आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांना दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी 2 जणांना कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं आहे. दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.