आरक्षण विरोधात एम.के. मढवी न्यायालयात

नवी मुंबई ः शिवसेनेचे नगरसेवक एम.के. मढवी यांनी ऐरोली प्रभागात झालेल्या आरक्षणावरुन मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पालिकेच्या निवडणुक अधिकार्‍यांनी ऐरोली विभागातील आरक्षित केलेले प्रभाग हे चुकीचे असल्याने नव्याने आरक्षण टाकण्याची मागणी मढवी यांनी याचिकेत केली आहे. पालिकेने आरक्षण करताना ग्राह्य धरलेले वर्ष हे चुकीचे असल्याचा आरोपही त्यांनी याचिकेत केला असून त्याची सूनावणी 16 मार्च रोजी होणार आहे.