शिवसेनला जोरदार झटका

नवी मुंबई : पालिकेची निवडणूक जवळ आल्याने फोडाफोडीच्या राजकारणाने जोर धरला आहे. घणसोली येथील शिवसेनेचे तीन नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा नवी मुंबईत आहे. शुक्रवारी सेनेचे प्रशांत पाटील, कमलताई पाटील  व सुुवर्णा पाटील यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा आयुक्तांकडे सुपुर्द केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी आ. संदीप नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत उपस्थित होते. 

नवी मुंबईच्या घणसोली येथील शिवसेनेचे एकाच कुटुंबातील तीन नगरसेवक भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. घणसोलीतील सेंट्रल पार्कचा लोकार्पण सोहळ्याच्या पोस्टर्सवर या तीनही नगरसेवकांचे फोटो झळकले होते. त्यावेळीच हे नगरसेवक भाजपात जाणार अशी चर्चा रंगली होती. शुक्रवारी या तीनही नगरसेवकांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिलल्याने शिवसेनेला ऐन निवडणुकीच्या तोंडावर जोरदार झटका बसल्याचे बोलले जाते. मात्र, नगरसेवकांनी पक्षांतराचे राजकारण सुरू केल्याने पालिका निवडणूक चुरशीची ठरणार आहे.