राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 37

मुंबई : राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 37 वर गेली आहे. मुंबईत 3 आणि नवी मुंबई एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 वर आणि नवी मुंबतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन झाली आहे. कालही पिंपरी चिंचवडमध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला होता.

 कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

खारघर येथील क्वारन्टाईन सेंटरमध्ये आता पर्यंत 33 जणांना आणण्यात आले आहे. यामध्ये पनवेल, उरण आणि खालापूर येथे परदेशातून आलेल्या भारतीय लोकांना समावेश आहे.

पुणे - 16

मुंबई - 8

ठाणे - 1

कल्याण- 1

नवी मुंबई -  2

पनवेल - 1

नागपूर - 4

अहमदनगर - 1 

यवतमाळ -2

औरंगाबाद - 1

अलिबाग येथे 3 जण निरीक्षणाखाली

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे 3 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यात गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत, असं आरोग्य विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. तिघे कामानिमित्त दुबईला गेले होते. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने त्यांना निगराणी कक्षात दाखल करण्यात आले आहेत.