भाजपचे आणखी दोन नगरसेवक सेनेत

नवी मुंबई : नवी मुंबईत पुन्हा एकदा भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या 2 नगरसेविकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुरेश कुलकर्णीनंतर आता भाजपच्या कविता आगोंडे, सुरेखा नरबागे यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. त्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.   

फेब्रुवारी महिन्यातदेखील नवी मुंबईमध्ये भाजपच्या 4 नगरसेवकांनी राजीनामा देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना भाजप नेते गणेश नाईक यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आतापर्यंत भाजपच्या 6 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. या सर्व नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

नाईक हे आपल्या सर्वच नगरसेवकांसह भाजपमध्ये आल्याने मुळ भाजपच्या असलेल्या नगरसेवकांमध्ये असंतोषाची भावना आहे. आपल्याला डावललं जातेय अशी त्यांची भावना असून त्यामुळे त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या नेरुळ येथील नगरसेविका कविाता आंगोडे आणि सुरेखा नरबागे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आयुक्त मिसाळ यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर व विठ्ठल मोरे, उपनेते विजय नाहटा व शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.