23 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

मुंबई ः महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. 23 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-पुणे-मुंबई निझामाबाद, नागपुर-मुंबई, पुणे-नागपुर, भुसावळ-नागपुर यासारख्या लांबपल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या 17 ते 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. याआधी मध्य रेल्वेने मुंबईत लोकल रेल्वेची स्वच्छता हाती घेतली आहे. रेल्वे अधिक कशी जंतुनाशक राहिल यावर भर देण्यात आला आहे. आता तर मध्य रेल्वेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय-योजना म्हणून अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या 17 ते े31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.