कोरोना बाधित जिल्ह्यांना 45 कोटींचा निधी

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकांना खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढतच  आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पसरलेली रोगराई नियंत्रण करण्यासाठी विभागीय आयुक्तांना 45 कोटी इतका निधी देण्यास मान्यता दिली आहे. बाधित जिल्ह्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य कार्यकारी समितीने घेतला आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोकण विभागासाठी 15 कोटी, पुणे विभागासाठी 10 कोटी, नागपूर विभागासाठी  5 कोटी, अमरावतीसाठी 5 कोटी, औरंगाबादसाठी 5 कोटी, नाशिकसाठी 5 कोटी याप्रमाणे एकूण 45 कोटीचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव नियंत्रीत करण्यासाठी बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी, छाननीसाठी सहाय्य, उेपींरलीं ढीरलळपस शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपभोग्य वस्तू, अग्निशमन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांच्या वैयक्तीक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व व्हेंटीलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून हा 45 कोटी रुपयांचा निधी विभागीय आयुक्तांना वितरीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

कोकण विभाग सज्ज 

कोकण विभागातील सात जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्याचे संबंधित जिल्ह्यांना वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली. कोकण विभागीय क्षेत्रात कोरोनाविषयी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी सीबीडी येथील कोकणभवन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दौंड यांनी ही माहिती दिली. कोकण विभागातील सात जिल्ह्यांतील महसूल, पोलीस, नगरपालिका आणि ग्रामपंचायत पातळीवर यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. संबंधित जिल्हाधिकार्‍यांना आणि जिल्हास्तरीय अधिकार्‍यांना आवश्यक ते प्रशासकीय अधिकार देण्यात आले आहेत. सोमवारपासून कोकणातील महत्त्वाची देवस्थाने भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. या देवस्थानांत सध्या केवळ पूजा करण्याची अनुमती देण्यात आली आहे, अशी माहिती दौंड यांनी दिली. विमानतळ आणि जेएनपीटी येथे प्रवाशांची तपासणी केली जात आहे. तसेच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन वैद्यकीय तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली असून या ठिकाणी बाहेरून येणाजया वाहनचालकांची तपासणी केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. कोकण विभागात अनेक ठिकाणी पालखी सोहळा, यात्रा, शोभायात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतात तेदेखील स्थानिक स्तरावर बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही र्दौड यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.