कोरोनाची दहशत ; मशिदी बंद करण्याचे सीरत कमिटीचं आवाहन

पुणे : कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने उपाययोजना केल्या आहेत. त्याच प्रमाणे काही कठोर निर्णयही घेतले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे मुंबई, पुण्यासह राज्यभरात संचारबंदी सदृश्य स्थिती आहे. राज्यभरातील मंदिरं तसेच धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुण्यातील सीरत कमिटीनं मशिदी बंद करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे शुक्रवारीचा नमाझ घरीच पढण्याबाबत मुस्लिम बांधवांना सूचना मौलाना निझामुद्दीन फखरुद्दीन आणि मौलाना अहमद कादरी यांनी दिल्या आहेत.