कोरोनाची दहशत ; एसटीमध्ये ‘सुरक्षित अंतर ठेवा योजना

आसन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंशत: लॉकडाऊन करण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी एसटीने कंबर कसली आहे.

एसटीच्या प्रवासामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत असून, त्यानुसार सुरक्षित अंतर ठेवून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्यासाठी काही सीट्स बैठक व्यवस्थेच्या बदललेल्या रचनेनुसार बंद ठेवण्यात येणार आहेत. दोघांच्या सीटवरील रांगेत फक्त एकाच व्यक्तीला बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही बस मधून उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात येत आहे. यासंदर्भातील परिपत्रक नुकतेच महामंडळाच्या वाहतूक शाखेने आपल्या स्थानिक प्रशासनाला पाठवले आहे.