भारतात पाचव्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू

नवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्त पाचव्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जयपूरमध्ये एका महिलेचा कोरोना विषाणुमुळे मृत्यू झाला आहे तर कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 223 वर पोहोचली आहे.

राजस्थानच्या जयपूरमध्ये 69 वर्षांची इटालियन पर्यटक महिला भारतात आली होती. तपासणीत तिला कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं होतं. तिच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या आता 223 वर पोहोचली आहे. त्यापैकी 13 जणांवरील उपचार यशस्वी ठरलेत. हे 13 जण व्हायरसमुक्त झालेत.