वायरस आणि प्रतिकारशक्ती

जगभर दहशत माजवणार्‍या कोरोनाने 3000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकांच्या मनात भीतीने कहर केला आहे. शासनस्तरावर युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत; पण आपणही सहकार्य करण्याची नितांत गरज आज निर्माण झाली आहे. घाबरून जाणे हा काही यावरचा उपाय नाही. आलेले संकट धुडकावून कसे लावता येईल हे महत्त्वाचे आहे. योग्य ती खबरदारी घेऊन या विषाणूचा नाश करणे हे सर्वांत मोठे आव्हान जागतिक पातळीवर निर्माण झाले आहे. सर्वांत आधी मनातून याची भीती नाहीशी करणे गरजेचे आहे आणि सोबतच खबरदारी घेणेही महत्त्वाचे आहे. 

कोरोना व्हायरस शरीरावर नेमकं कसं आक्रमण करतो? संक्रमणानंतर शरीरात कोणत्या प्रकारची लक्षणं पाहायला मिळतात?, कोरोना व्हायरसमुळे गंभीर आजारी पडण्याची किंवा मृत्यू होण्याची शक्यता किती आहे? यावर काय उपाय आहे? असं अनेक प्रश्‍न आपल्याला भेडसावत आहेत. या सर्वांवर संशोधन सुरू आहेच; पण कोणत्याही अफवेला पसरवण्याचे काम आपल्याकडून होणार नाही याची दक्षता वैयक्तिक पातळीवर घेतली पाहिजे. 

‘कोरोना’ व्हायरस संसर्गजन्य असल्याने तो वेगाने सगळीकडं पसरत आहे, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. मात्र, हवेतून त्याचा प्रसार होत नाही, असेही संशोधनात समोर आले आहे. हा विषाणू 400-500 मायक्रो एवढ्या आकाराचा असल्याने एखादा लागण झालेला रुग्ण शिंकला किंवा खोकला की त्यातून बाहेर पडणार्‍या तुषारांमार्फत तो बाहेर येतो. शरीराच्या बाहेर पडल्यावर आकाराने जड असल्याने तो तीन फुटांपर्यंत खाली जमिनीवर पडतो. तसेच त्वचेवर तो दहा मिनिटे, कपड्यावर नऊ तास व धातूवर दहा तास जिवंत राहतो, असे संशोधन सांगते. त्यामुळे वारंवार हात धुणे गरजेचे आहे, तसेच हा विषाणू 27 डिग्री तापमानात जगू शकत नाही असेही संशोधन सांगते.

मानवाने आपली प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाच नाही तर इतर कोणताही विषाणू कोणत्याही प्रकारचा व्हायरस शरीरात प्रवेश करण्याची शक्यता कमी असते. सकस, पोषक आहार, संतुलित आहार गरजेचा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपला डबाबंद किंवा पॅकेट बंद पदार्थांचे सेवन करण्याकडे फार कल असतो; परंतु त्यामुळे तात्पुरती भूक शमेल; परंतु दीर्घ काळासाठी आजार बळावेल. सर्व प्रकारचे अन्न शरीरात गेले पाहिजे, म्हणजेच फळभाज्या, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, कडधान्य, कंदमुळे, फळे, सुका मेवा, दूध, दुधाचे पदार्थ, मांसाहारी असला तर अंडी, मासे, निसर्गापासून मिळणारे पदार्थ कधीही उत्तमच. त्यामुळे नैसर्गिक ऊर्जा शरीराला मिळते. सकस आहारासोबतच व्यायाम महत्त्वाचा आहे. व्यायाम म्हणजे जिममध्ये जाऊन ताकद मिळवणे नाही. तर निसर्गाच्या सानिध्यात राहून ऊर्जा मिळवली पाहिजे. सकाळचे ऊन शरीराला मिळणे फार गरजेचे आहे. सूर्यकिरण शरीराला मिळाल्यामुळे त्यातून ‘ड’ जीवनसत्त्व मिळते, ज्याची शरीराला गरज असते. दोन जेवणामध्ये आवश्यक तेवढे अंतर असलेच पाहिजे. कधीतरी उपवास केला पाहिजे. जेव्हा शरीरात कोणताही अन्नपदार्थ जात नाही, तेव्हा शरीरात डीटॉक्सीफिकेशन होते, त्यामुळे शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत होते व नवीन ताकद शरीराला मिळते. ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. शरीराला योग्य पोषक आहार आणि झोप यापेक्षा आणखी काही गोष्टींची गरज आसते. त्या केल्या तर तुम्ही आजारांना दूर ठेऊ शकता, तुमची कार्यक्षमता वाढते.

 मोना मोळी-सणस