महाराष्ट्रात 107 कोरोनाबाधित

मुंबईत पाच तर अहमदनगरमध्ये एक पॉजिटिव्ह

नवी मुंबई ः महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 107 वर गेला आहे. मुंबईत पाच तर अहमदनगरमध्ये एक पॉजिटिव्ह रुग्ण आढळला आहे. 

देशात कोरोना रुग्णांची संख्या 519 वर गेली असून त्यातील महाराष्ट्रात 107 तक केरळमध्ये 87 रुग्ण सापडले आहेत. सर्वांनी खबरदारी बाळगण्याची गरज आहे. गावाकडं आलेल्या लोकांमध्ये काही लक्षण आढळल्यास त्यांना रुग्णालयात घेऊन जावं. पण गावात येऊन देणार नाही, ही भूमिका हे राज्याला शोभणारी नाही. नागरिकांनी गर्दी करू नये. शहरी भागातून गावात आलेल्या नागरिकांशी माणुसकीने वागा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 

रुग्णांची टेस्ट करण्यासाठीच्या लँब कमी पडू नये म्हणून आता सरकारच्या वतीने ही टेस्ट खाजगी लॅबला देखील करण्याची परवानगी दिली आहे. शासनाने ’मेट्रोपोलिस’ आणि ’थायरो केअर’ या खाजगी लॅबना टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे. मात्र यासाठी 4 हजार 500 इतकं शुल्क आकारण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब ही आहे की, या लॅबचे कर्मचारी डॉक्टरांनी टेस्ट करण्याची गरज सांगितलेल्या रुग्णांचीच टेस्ट करणार आहेत. हे कर्मचारी संबंधित रुग्णांच्या घरी जाऊन त्यांचे सँपल घेणार आहेत. त्यानंतर त्याचे रिपोर्ट 48 तासात देण्यात येणार आहेत. सध्या मेट्रोपोलीसच्या 400 ते 500 शाखा महाराष्ट्रात आहेत. लॅबच्यावतीने यासाठी काही कर्मचार्‍यांना विशेष ट्रेनिंग सुद्धा देण्यात आले आहे.