हायवेवर मोठा बंदोबस्त

नवी मुंबई : राज्यात संचारबंदी असतानाही काही महाभाग रस्त्यावर उतरत आहेत. त्यातच काही जण मुंबईतून बाहेरही जात आहेत. अशाच मुंबई बाहेर पडणार्‍या लोकांना अडवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. यासाठी वाशी टोलनाक्यावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गाड्या अडवून पोलिसांकडून तपासणी सुरु आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर गाड्यांना पुढे जाण्यास मनाई करण्यात येत आहे. तसंच विनाकारण बाहेर पडणार्‍यांना नवी पोलिसांनी परत मुंबईत पाठवले आहे. हायवेवर सर्वत्र मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

कृषिविषयक सर्व वाहतूक सुरू राहणार असून जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणार्‍या वाहनांवर कंपनीचं नाव बंधनकारक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती, सहकार्याबद्दल केंद्र सरकारचे मानले आभार आहेत.