कर्जधारकांना हप्ते भरण्याची सूट

4 बँकांचा मोठा दिलासा ः कालवधी तीन महिन्यांनी वाढवला

मुंबई : कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे कॅनरा बँक, आयडीबीआय, पंजाब नॅशनल आणि बँक ऑफ बडोदाने पुढील तीन महिने मासिक हप्ता न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कर्जाचा कालावधी पुढील तीन महिन्यांसाठी वाढवला जाईल असं देखील नमूद केले आहे. सध्या चार बँकांनी कर्जधारकांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र इतर बँकांच्या निर्णयाकडे सध्या लक्ष आहे.

महिन्याच्या पहिल्या तारखेपासून विविध प्रकारचे ईएमआय भरण्याचे दिवस सुरु होतात. 27 मार्चला रिझर्व बँकेनं तीन महिने कर्जाचे हप्ते देण्याची सक्ती करु नका असे निर्देश दिले होते. परंतु अंतिम निर्णय बँकावर सोडला होता. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी चा बँकानी ज्यात कॅनरा बँक, आयडीबीआय, पंजाब नॅशनल आणि बँक ऑफ बडोदा यांचा समावेश आहे. त्यांनी पुढच्या तीन महिन्यासाठी हप्ते न देण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार कर्जाचा कालावधी पुढे तीन महिने वाढवला जाईल असं देखील नमूद केलं आहे. ही मुभा 1 मार्च ते 31 मे या कालावधीसाठी असणार आहे. 

या मध्ये सर्व प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे. कृषी, गृह, वाहन, लघु आणि मध्यम उद्योग, वैयक्तिक कर्ज, कॉर्पोरेट तसंच कॅश क्रेडीट फॅसिलिटीवरची रिकव्हरी पण तीन महिन्यासाठी थांबवली आहे. या निर्णयाबरोबरच रेपोरेट कमी केल्यानं कर्जावरचा इंटरेस्ट रेट कमी करुन त्याचा फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णयही काही बँकानी घेतला आहे.