डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने 37 लाख रुपयांची मदत

अलिबाग : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारकडे मदतीचा ओघ सुरुच आहे. रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने 37 लाख रुपयांची मदत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे देण्यात आली.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या लढाईत निधीची कमतरता पडू नये यासाठी विविध स्तरातून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मागे राहीलेले नाही. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आणि राहुल धर्माधिकारी यांनी 37 लाख रुपयांच्या निधीचा डिमांड ड्राफ्ट जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला. त्यामध्ये प्रामुख्याने कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान साहाय्यता निधीकरिता 16 लाख रुपये, मुख्यमंत्री साहाय्यता निधीकरिता 16 लाख रुपये आणि रायगड जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीकरिता पाच लाख रुपयांचा समावेश आहे.