कोरोनाच्या ‘या’ टेस्ट किटला भारताने दिली मान्यता

मुंबई : कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त संशयित रुग्णांच्या चाचण्या होणे आवश्यक आहे. आपल्याकडे चाचणी करणार्‍या लॅबची संख्या आणि सापडणारे रुग्ण यांचे प्रमाण वाढत आहे. यावर उपाय म्हणून अँटिबॉडी टिटेक्शन चाचणीला सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनाची लागण झालेली आहे की नाही हे या चाचणीतून क्षणात समजू शकते.

श्‍वसनाचा आजार असणार्‍या किंवा कोविड-19 ची लक्षणं जाणवणार्‍या कुणालाही ही चाचणी केल्यानंतर लागण झाली आहे की नाही हे क्षणात कळू शकेल. या टेस्ट किटला पुण्याच्या छखत आणि दिल्लीच्या खउचठ या दोन्ही केंद्रीय संस्थांनी परवानगी दिली आहे. कङङ ङळषशलरीश ङळाळींशव या सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करणार्‍या संशोधन संस्थेने ही किट विकसित केली आहे. यामुळे आता स्वॅब टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत कोरोनाग्रस्ताचं आयसोलेशन थांबणार नाही. त्याऐवजी त्वरित त्याला रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करून उपचार सुरू करता येतील.

कोविड-19 ची लागण झाली आहे की नाही, याची खात्रीशीर चाचणी रुग्णाच्या घशातल्या द्रावावरूनच होते. पण ही स्वॅब टेस्ट करण्यास वेळ जातो. त्याऐवजी या चाचणीने किमान प्राथमिक टप्प्यावर कोरोना संशयित रुग्णांचं अलगीकरण करणं सोयीचे होणार आहे.