नवी मुंबईत करोनाबाधितांची संख्या 910

नवी मुंबई ः नवी मुंबईतील करोनाबाधितांची वाढती संख्या महापालिका प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. बुधवारी नवी मुंबईत आणखी 54 करोनाबाधित आढळून आल्याने बाधितांची एकूण संख्या 910 झाली आहे. तर, अद्याप 1313 नागरिकांचे करोना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.

नवी मुंबईत बुधवारी आढळलेल्या 54 रुग्णांमध्ये नेरूळ- 5, वाशी- 7, तुर्भे-4, कोपरखैरणे-3, घणसोली- 7, दिघा - 2 व बेलापूर येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. महापालिकेच्या कोव्हिड 19 रुग्णालयात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 73 करोनाबाधित उपचारार्थ दाखल आहेत. तर, महापालिका क्षेत्रात आजतागायत 19 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.