पनवेेलमध्ये 400 हून अधिक कोरोनाबाधित

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्र तसेच ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 400 च्या पुढे गेला आहे. हा आकडा वाढत चालला असला तरी कोरोनामुक्त रुग्णांची वाढती संख्याही दिलासादायक आहे. आतापर्यंत पनवेलमधील 200 हून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांचा आकडा 318 आहे. यापैकी 167 रुग्ण बरे झाले आहेत. तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा आकडा 128 झाला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 53 आहे. तर 3 जणांचा ग्रामीण भागात मृत्यू झाला आहे. मात्र, बरे होणार्‍या रुग्णांचा वाढती संख्या ही पनवेलकरांसाठी दिलासादायक आहे.पनवेल महापालिका हद्द व ग्रामीण भागातील बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या 220 आहे. पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालय तसेच एमजीएम रुग्णालयाला कोविडचा दर्जा देण्यात आला आहे. शेकडो रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. शेकडोंच्या संख्येने परिचारिका, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत आहेत.