Breaking News
नवी मुंबई ः यावर्षीचा दिवाळी सण 14 नोव्हेंबर पासून सुरू होत असून नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जावी याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सन 2019-20 वर्षाकरिता महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना रू. 25 हजार व करार, तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना रू. 19 हजार सानुग्रह अनुदान जाहीर केलेले आहे. यामुळे पालिका अधिकारी व कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महापालिका आस्थापनेवरील अधिकारी,कर्मचारी तसेच राज्य शासनाकडील बदलीने,प्रतिनियुक्ती, प्रशिक्षणार्थी अधिकारी - कर्मचारी यांना रू. 25 हजार सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. तसेच किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी - कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना रू. 19 हजार इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जाणार आहे. याशिवाय सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणार्या कंत्राटी कर्मचार्यांनाही करार पद्धतीवरील कर्मचार्यांप्रमाणे रू. 19 हजार इतके सानुग्रह अनुदान त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना रू. 9 हजार सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai