भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 30, 2024
- 745
पर्यावरणवादी संस्थेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक नगरीच्या हरित पट्ट्यातील 200 झाडांची कत्तल करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. ही झाडे ज्या भुखंडावर आहेत तो भुखंड झाडांची कत्तल करुन प्रकल्पग्रस्त (पीएपी) यांच्या भूखंड वाटपासाठी दिला जाणार असल्याने संताप व्यक्त होत आत्ते. यामुळे आता शेवटच्या हरित पट्ट्याचा बळी जाणार असल्याने याबाबत पर्यावरणवादी संस्थेने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
एमआयडीसीच्या ठाणे-बेलापूर रसायन उद्योग पट्ट्यातील पावणे येथील एकमेव मोकळ्या जागेतील तब्बल 200 झाडे प्रकल्पग्रस्तांना भूखंड तयार करण्यासाठी तोडण्यात येणार आहेत, असा दावा नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी केला आहे. सरकारने प्रकल्पग्रस्तांना भूखंडवाटप करण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही, मात्र हिरवा पट्टा जो रासायनिक कारखान्यांच्या परिसरात प्राणवायू देण्याचे महत्त्वाचे काम करतो अशा ठिकाणी निर्दयीपणे 200 झाडे तोडली जात आहेत, हे अत्यंत धक्कादायक आहे, असेही कुमार यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना प्लॉट क्रमांक 7 या मोकळ्या भूखंडावरील झाडे वाचवण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती करणारा ई-मेल पाठवला आहे. एक एकरचा भूखंड हा मुळात दलदलीचा परिसर होता आणि अत्यंत ज्वलनशील पेट्रोलियम पदार्थांचा व्यवहार करणाऱ्या शेजारच्या खासगी कंपनीने 20 ते 25 वर्षांपूर्वी ते हरित क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. कंपनीने वृक्षारोपण केले आणि आता सुमारे 200 झाडे आहेत, ज्यात अनेक पूर्ण वाढलेली खजुराची झाडे आणि फुलझाडे आहेत.
- हिरवळ वाचवण्याची जबाबदारी पालिकेचीही वृक्षगणना करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेने या मोकळ्या भूखंडावरील झाडांची नोंद घेतली आहे. हिरवळ वाचवण्याची जबाबदारी नागरी संस्थेची अर्थात महापालिकेचीसुद्धा आहे. एमआयडीसी आणि सिडको यांच्यामध्ये त्यांनी पीएपी सेटलमेंटसाठी योग्य योजना तयार करावी, असे कुमार म्हणाले. औद्योगिक पट्टा आणि त्यानंतर नियोजित शहराची निर्मिती होऊन सहा दशके उलटूनही पीएपीचे पुनर्वसन करण्याचे काम शहर करत आहे हे धक्कादायक आहे, अशी खंत पारसिक ग्रीन्सचे विष्णू जोशी यांनी व्यक्त केली. खासगी कंपनी वा संस्था झाडे स्वखर्चाने लावते, जोपासते. मात्र एमआयडीसीचे अधिकारी भूखंडाचे श्रीखंड लाटण्यासाठी ती झाडे तोडतात. हे खूप क्लेशदायक आहे. असे येथील काही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai