अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 10, 2023
- 1286
अंतरिम स्थगिती देण्यास सत्र न्यायालयाचा नकार
नवी मुंबई ः नेरुळ येथील श्री गणेश गृहनिर्माण संस्थेमध्ये 39 लाखांच्या अपहाराप्रकरणी विशेष लेखा परिक्षक वर्ग 2 यांनी अध्यक्ष अशोक गावडे यांच्यासह 46 समिती सदस्यांवर नेरुळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. गावडे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर कोणतेही संरक्षण देण्यास न्यायालयाने नकार देवून संबंधित पोलीस स्थानकातून अहवाल मागवला आहे.
सदस्यांनी केलेल्या तक्रारीवरुन जिल्हा उपनिंबधकांनी नेरुळ येथील श्री गणेश गृहनिर्माण सोसायटीचे स्थापनेपासून 2016 सालापर्यंतचे विशेष लेखा परिक्षण करण्याचे आदेश दिले होते. या आदेशावरुन जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग 2 यांनी लेखापरिक्षण करुन आपला अहवाल जिल्हा उपनिंबधकांना सादर केला होता. अनेक गंभीर आक्षेप सदर अहवालात नोंदवण्यात आले होते. त्यामध्ये 39.93 लाखांचा अपहार, बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करुन अल्पिक फायनान्स कंपनीची मालमत्ता हस्तांतरण करणे, अधिकार व पदाचा गैरवापर करुन संस्थेचे नुकसान करणे यापद्धतीचे आरोप अध्यक्ष अशोक गावडे यांच्यासह 46 समिती सदस्यांवर ठेवण्यात आले होते.
या अहवालाची दखल घेवून सहनिंबधक सहकारी संस्था (सिडको) यांनी 31 ऑगस्ट 2023 रोजी संस्थेच्या अपहारास व गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश लेखा परिक्षक वर्ग-2 विजय पाखले यांना दिले होते. पाखले यांनी 23 सप्टेंबर 2023 रोजी नेरुळ पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी भा.द.वि. कलम 406, 409, 420, 465, 467, 468, 471 व 120ब अन्वये गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. सदर दाखल झालेल्या गुन्ह्या प्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून अशोक गावडे व इतर 22 जणांनी सीबीडी येथील न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तसेच अटकेपासून अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने गावडे व इतर सह आरोपी यांना अटकपुर्व जामिन मंजुर करण्यापुर्वी अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला असून तपास अधिकारी यांना 21 नोव्हेंबर रोजी म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिल्याने गावडेंसह इतर पदाधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सहकार मंत्र्याची स्थगिती
- विशेष लेखा परिक्षक विजय पाखले यांनी नेरुळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केल्यानंतर श्री गणेश गृहनिर्माण सोसायटीने सहकार राज्यमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासमोर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 154 अन्वये पुनर्निरिक्षण अर्ज सादर केला आहे.
- सदर अर्जावरील सूनावणी 25/9/2023 रोजी पुर्ण होवून सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी चाचणी लेखापरिक्षण अहवाल व विर्निदिष्ट अहवालावरील कारवाईस पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी 5 जानेवारी 2024 रोजी ठेवली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai