कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 30, 2024
- 993
मुंबई : राज्यातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. दरम्यान सध्या राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचे चित्र दिसत आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात तापमानाचा पारा हा 40 ते 42 डिग्री से. राहण्याची शक्यता आहे. सरासरी कमाल तापमानापेक्षा 3 ते 4 डिग्रीने तापमान वाढण्याची शक्यता असल्याचे मत खुळे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मार्चला एक दिवस मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. 31 मार्चला पुन्हा राज्यातील तापमानाचा पारा वाढणार असल्याचे खुळे म्हणाले. मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील मराठवाडा व लगतच्या विदर्भातील जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगांव, नाशिक अहमदनगर अशा काही जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ होणार आहे.
- अवकाळीचा फटका
उन्हाळ्याला सुरुवात झालेली असताना राज्यात अवकाळी पाऊस आलाय. विविध जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पंढरपूर, वाशिम, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, नाशिकमधील चांदवडमध्ये अवकाळी पाऊस पाहायला मिळाला. या पावसामुळे गरमीत हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी आंबा बागांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने एकच धावपळ उडाली आहे. संपूर्ण कोकणात सह्याद्रीवर अडकून आदळतात. त्यामुळं उष्णतेची जबरदस्त लाट मुंबईसह कोकणात महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा जाणवत
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai