पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 10, 2023
- 834
नवी मुंबई ः बेलापूर-ऐरोली हा 22 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये सहज करता यावा, यासाठी सिडकोने आखलेल्या पाम बीच मार्गाचा घणसोली-ऐरोली विस्तारीकरण 12 वर्षांहून अधिक काळापासून रखडला आहे. मात्र आता हा मार्ग आता लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. या घणसोली-ऐरोली पामबीच मार्गावरील खाडीवर पुल बांधणे या कामासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम 411 कोटी 51 लाख आहे.
बेलापूर-वाशीसारख्या उपनगरांमधून निघालेला हा रस्ता थेट ऐरोली-मुलुंड पुलाच्या पायथ्याशी नेण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने आखला होता. बेलापूर ते ऐरोली हा 22 किलोमीटरचा मार्ग खारफुटीच्या अडथळ्यात अडकला आहे. या प्रकल्पातील बेलापूर-वाशी हा आठ किलोमीटरचा मार्ग 2002 मध्ये पूर्ण झाला आहे. हाच मार्ग पुढे ऐरोलीपर्यंत नेण्यात आला आहे. मात्र घणसोली ते ऐरोली दरम्यान असलेला चार किलोमीटरचा मार्ग खारफुटीच्या जंजाळात अडकला होता. मात्र पर्यावरण विभागाची परवानगी मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या खर्चाचा मुद्दा समोर आल्याने पुन्हा या मार्गाला ब्रेक लागला.
घणसोली सेक्टर 14 ते ऐरोली सेक्टर 10 ए यादरम्यानच्या साधारण दोन किमी लांबीच्या मार्गासाठी यापूर्वी 250 कोटींचा खर्च निश्चित केला होता. मात्र, या मार्गाची लांबी दीड किमीने वाढल्याने खर्चही वाढला. सध्याच्या अंदाजानुसार या प्रकल्पाचा खर्च 425 कोटी अपेक्षित आहे. यापैकी सिडकोने अर्धा खर्च उचलावा, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू होते; परंतु, सिडकोने आधीच्या अंदाजानुसार फक्त 125 कोटी देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे महापालिकेसमोर आर्थिक पेच निर्माण झाला होता. आता सिडकोने प्रकल्पाचा पन्नास टक्के खर्च देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे घणसोली पामबीच मार्गाचा ऐरोलीपर्यंतचा विस्तार दृष्टिपथात आला आहे.
खर्च 411 कोटी 51 लाख रुपये
- सुधारित आराखड्यानुसार या मार्गाची लांबी दीड किमीने वाढली आहे. त्यामुळे तो आता 3.47 किमी लांबीचा झाला आहे. यात खारफुटीच्या क्षेत्रात दोन किमी लांबीचा पूल असणार आहे.
- या कामासाठी अंदाजपत्रकीय रक्कम 411 कोटी 51 लाख रुपयांच्या घरात आहे. निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यावर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai