Breaking News
10 जानेवारीपर्यंत हफ्ते भरण्याची मुभा
महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील सदनिकेच्या हप्त्यांचा भरणा न केलेल्या अर्जदारांना सदनिकेची संपूर्ण रक्कम भरण्याकरिता 10 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला असून अर्जदारांनी केलेल्या विनंतीवरून सदर मुदतवाढ देण्यात आली आहे.
सिडको महागृहनिर्माण योजनेंतर्गत 20182019 दरम्यान विविध प्रवर्गांकरीता सदनिकेच्या सोडती काढण्यात आल्या होत्या. सदर सोडतीमधील सदनिका या आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी या 5 नोडमध्ये सदर गृहनिर्माण योजनेतील सदनिका साकारण्यात आल्या आहेत.
या सोडतीमध्ये कागदपत्रांच्या छाननीअंती पात्र ठरलेल्या अर्जदारांना (दि. 09.09.2019 ते दि. 21.02.2022 दरम्यान) वाटपपत्रे देण्यात आली होती. या वाटपपत्रांमध्ये, अर्जदारांना सदनिकेपोटी भरणा करावयाच्या रकमेच्या हप्त्यांचे वेळापत्रक नमूद करण्यात आले होते. त्यानुसार काही अर्जदारांनी एकूण हप्त्यांपैकी काही हप्त्यांचा भरणा केलेला आहे व काही अर्जदारांनी आजतागयत एकाही हप्त्याचा भरणा न केल्याचे आढळून आले आहे. असे अर्जदार कायद्यानुसार वाटपपत्र रद्द करण्यास पात्र ठरतात. तथापि, यांपैकी काही अर्जदारांकडून हप्त्यांचा भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी विनंती वारंवार सिडकोकडे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने, सिडको महामंडळाकडून 30 एप्रिल 2023 पर्यंत हप्त्यापोटी शिल्लक रकमेचा भरणा करण्याकरिता विलंबशुल्कात सवलत देण्याबाबतची अभय योजना राबविण्यात आली होती. परंतु या योजनेचा लाभ काही अर्जदार त्यांच्या विविध अडचणी/कारणांमुळे घेऊ शकले नसल्यामुळे त्यांनी याकरिता मुदतवाढ देण्याची विनंती सिडकोकडे केली होती.
त्यानुसार दि. 09.09.2019 ते दि. 21.02.2022 या कालावधीत वाटपपत्रे देण्यात आलेल्या अर्जदारांपैकी जे अर्जदार थकबाकीदार आहेत, त्यांच्यासाठी अंतिम संधी म्हणून 10 जानेवारी 2024 पर्यंत विलंब शुल्कासह उर्वरित सर्व हप्त्यांचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अशा सर्व थकबाकीदार अर्जदारांनी या अंतिम संधीचा लाभ घेऊन सदनिकेच्या संपूर्ण रकमेचा (विलंब शुल्कासह) सिडको महामंडळाकडे भरणा करावा. या कालावधीत जे अर्जदार संपूर्ण रकमेचा भरणा करण्यास असमर्थ ठरतील, अशा थकबाकीदार अर्जदारांची वाटपपत्रे रद्द करण्यात येऊन नियमानुसार त्यांची अनामत रक्कम (एचऊ) जप्त (ऋेीषशळीं) करण्यात येईल. तसेच हप्त्यापोटी भरलेल्या रकमेपैकी 10% रक्कम कापून उर्वरित रकमेचा परतावा अर्जदारांच्या बँक खात्यात करण्यात येईल.
सिडको महामंडळाच्या 2018-19 महागृहनिर्माण योजनेतील पात्र अर्जदारांनी वेळोवेळी केलेल्या विनंतीचा विचार करून, मा. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार अशा पात्र अर्जदारांना पुन्हा एक अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याने निश्चितच आणखीन अनेक नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.- अनिल डिग्गिकर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai