खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


घरांचे दर कमी करण्यास सिडको राजी

शासनाला प्रस्ताव पाठवण्याचे सिडको एमडींचे संकेत

नवी मुंबई ः सिडकोने काढलेल्या दिवाळी 2022 या गृहनिर्माण योजनेतील घरांच्या वाढीव किंमती कमी करण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. यासंदर्भात मनसे, सोडतधारकांचे शिष्टमंडळ यांची शुक्रवारी सिडको व्यवस्थापक संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी घरांच्या किंमती कमी करण्यासंदर्भात राज्य शासनाला सकारात्मक प्रस्ताव पाठवणार असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले.   

पंतप्रधान आवास योजनेतील 7849 घरांची लॉटरी काढताना सिडकोने आर्थिक दुर्बल उत्पन्न गटातील सोडत धारकांना उलवे नोड येथे 35 लाखांच्या किमतीत घरांचे दर ठेवले आहेत. याबाबत ‘आर्थिक दुर्बलांच्या स्वस्त घरांची सिडकोकडून चेष्टा' या मथळ्याखाली ‘आजची नवी मुंबई'ने सर्वप्रथम सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेवून सोडतधारकांनी घरांचे दर कमी करण्याची मागणी लावून धरली. वाढीव दर कमी करावेत, म्हणून सिडको सोडतधारक महिना भरापासून लढा देत आहेत. या पार्श्वभुमीवर मनसेने सोडतधारकांच्या शिष्टमंडळासोबत शुक्रवारी सिडको व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्यासोबत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बामणडोंगरी, उलवे येथे 7,849 पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या वाढीव किंमती कमी करण्यासंदर्भात राज्य शासनाला सिडको सकारात्मक प्रस्ताव पाठवणार व राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे घरांच्या किंमती कमी करण्याबाबत निर्णय घेणार असे डॉ. संजय मुखर्जी, मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे, सिडको सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, मनसे शहर सचिव सचिन कदम, सिडको महाव्यवस्थापक फैय्याज खान व सिडको सोडतधारक यांच्या बैठकीत ठरले. 

तसेच सोडतधारकांना कागदपत्र पडताळणीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याचे सिडकोने जाहीर केले. त्यासोबतच 75,000 रुपये अनामत रक्कम शासनाचा पुढील निर्णय येईपर्यंत रद्द होणार नाही असे आश्वासन डॉ. संजय मुखर्जी यांनी दिले. यावेळी बेलापूर सिडको भवन येथे हजारोंच्या संख्येने सिडको सोडतधारक उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

  • आजची नवी मुंबईच्या वृत्ताची दखल
     ‘आर्थिक दुर्बलांच्या स्वस्त घरांची सिडकोकडून चेष्टा' या मथळ्याखाली ‘आजची नवी मुंबई' ने सर्वप्रथम सविस्तर वृत्त नोव्हेंबर 2022 मध्ये प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेवून सोडतधारकांनी घरांचे दर कमी करण्याची मागणी लावून धरली. त्यांच्या मागणीला सिडकोने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट