सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं'
- by विजय आहिरे
- Nov 03, 2023
- 974
धान्यांच्या किमतीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ; सूर्यफूल तेलाचे भाव दिलासादायक
नवी मुंबई : तोंडावर आलेल्या दिवाळी सणासाठी सर्वांची लगबग सुरु झाली आहे. खरेदीसाठी स्थानिक बाजारपेठांसह एपीएमसी मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. वाढणाऱ्या गर्दी प्रमाणेच डाळी, कडधान्यांच्या किंमतीतही गतवर्षीपेक्षा 10 ते 15 टक्के वाढ वाढ झाली आहे. त्यामुळे दिवाळी तोडांवर आली असतानाच सर्वसामान्याचं दिवाळं निघणार अशी परिस्थिती झाली आहे.
दसऱ्यानंतर वेध लागतात ते दिवाळीचे. आनंददायी असणाऱ्या या सणाची प्रत्येकालाच आतुरता असते. दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना एक वेगळे स्थान आहे. मात्र ते बनविण्यासाठी लागणाऱ्या धान्याच्या किमतीत दरवर्षी काही प्रमाणात वाढ होत असते. यावर्षीही डाळी व इतर पदार्थांच्या किमतीत 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. चणाडाळ नव्वदीच्या घरात पोहोचलेली आहे. भाजक्या डाळीने तर शंभरी पार केली आहे. पोहे, साखर, खसखस यांच्या किमतीतही वाढ झाली आहे. तेलाचे भाव मात्र काहीसे स्थिर असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत आहे. एपीएमसीच्या घाउक तसेच किरकोळ बाजारात ग्राहकांची गर्दी वाढू लागली असल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
बाजारात ग्राहकांची संख्या हळूहळू वाढत आहे. यावर्षी दिवाळीमध्ये चांगला व्यवसाय होण्याची आशा आहे. - चंदन इंटरप्राजेस, मसाला मार्केट, एपीएमसी
दरवर्षी सणावाराआधी अन्न-धान्याच्या किमतीत वाढ होत असते. परंतु, महत्वाचे सण असल्याने काहीही करून अन्न-धान्य घ्यावेच लागते. आनंदाचा सण आहे, आनंदात साजरा झालाच पाहिजे. - लताबाई तानाजी सपकाळ, गृहिणी, खारघर
एपीएमसीतील बाजार भाव
- चणाडाळ 80 ते 90
- भाजकी डाळ 108
- रवा 38
- मैदा 40
- साखर 42 ते 48
- खोबरे 140 ते 160
- तूप 500 ते 660
- बेसन 100 ते 108
- भाजके पोहे 76 ते 92
- शेंगदाणे 140 ते 156
- पातळ पोहे 64
- मका पोहे 64
- डालडा एक 100 ते 125
- पिठीसाखर 48
- खसखस 1680 ते 1760
- सूर्यफूल तेल 1460 ते 1530
- शेंगदाणा तेल 2900
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे