Breaking News
एकनाथ शिंदेेंच्या ताठर भूमिकेमुळे भाजपचा नाईलाज
नवी मुंबई ः भाजपाने महाराष्ट्रातील आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी राज्यात शिंदे यांच्या गटातील बहुचर्चित ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबत कोणताही निर्णय न झाल्याने मोठा संभ्रम पसरला आहे. संजीव नाईक व विनय सहस्रबुद्धे यांनी यापूर्वीच ठाणे मतदारसंघात जनसंपर्क सुरू केल्याने ही जागा भाजपकडे जाईल अशी हवा असताना शिंदे यांनी घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे हा मतदारसंघ शिंदे सेनेकडे राहणार असे बोलले जात आहे. त्यामुळे माजी खासदार संजीव नाईकांच्या राजकीय भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून यावेळी पाच भागात ही निवडणूक विभागली गेली आहे. पाचव्या टप्प्यात मुंबई आणि ठाणे या भागातील निवडणूक होणार असून त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली असून शिवसेनेने आपले सोळा उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. बीजेपीने व शिंदे सेनेनेही सात उमेदवार जाहीर केले असून काँग्रेस मात्र अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ चालवीत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या घटकपक्षात कशा पद्धतीने जागावाटप झाले याचा तपशील अजून जाहीर न झाल्याने कोणती जागा कोणत्या पक्षाच्या वाटेला आली याबाबत सर्वसामान्य अनभिज्ञ आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाणे हा गड असल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीपासूनच माजी खासदार संजीव नाईक आणि विनय सहस्रबुद्धे यादी जनसंपर्क सुरू केल्याने ही जागा भाजपाच्या वाटेला जाईल अशी हवा होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे अद्याप पर्यंत ही जागा कोणाच्या वाटेला जाते त्याचे उलगडण्यास थोडा काळ जावा लागेल. एकनाथ शिंदे यांच्या वतीने प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक या दोघांच्या नावाची चर्चा असून प्रताप सरनाईक यांना दहिसर मधून विरोध असल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या होत्या. उद्धव ठाकरे यांनी विद्यमान खासदार राजन विचारे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना प्रचारासाठी मुबलक वेळ दिला आहे. परंतु एकनाथ शिंदे किंवा फडणवीस ठाण्यातून कोणाला उभे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजन विचारे यांची ही खासदारकीची तिसरी टर्म असल्याने त्यांच्यासमोर तगडा उमेदवार देणे भाजपला गरजेचे आहे. भाजपाने महाराष्ट्रातून मिशन 45 जाहीर केले असल्याने प्रत्येक जागा त्यांना महत्त्वाची आहे. शिवसेनेचे रवींद्र फाटक किंवा प्रताप सरनाईक हे राजन विचारे यांना टक्कर देतील याबाबत खुद्द भाजप शाशंक असून संजीव नाईक यांच्याशिवाय पर्याय नसल्याची जाणीव भाजपला आहे. परंतु, संजीव नाईक यांना ठाण्यात शिरकाव करू देणे म्हणजे गणेश नाईकांसह भाजपचे ठाणे जिल्ह्यात बस्तान बसवणे आहे याची जाण शिंदे यांना असल्याने ते ठाणे लोकसभा मतदारसंघ आपल्याकडेच कसा राहील यासाठी दक्ष आहेत. दरम्यान भाजप ठाणे मतदार संघासाठी शिंदे यांना अतिरिक्त जागा देण्यास तयार असल्याचे खाजगीत बोलले जात आहे. हे शक्य न झाल्यास भाजप संजीव नाईक यांना शिंदे सेनेकडून उभे राहण्याची वेळ घालण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिंदे सेना आणि भाजप यांच्या राजकीय वर्चस्वाच्या लढाई माजी खासदार संजीव नाईक यांचे राजकीय अस्तित्व कोणाला लागले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या जागेचा तिढा सुटावा अशी अपेक्षा सध्या लोकसभा मतदारसंघातील जनता करत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai