पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा
- by मोना माळी-सणस
- Feb 05, 2024
- 728
रस्ते, अंतर्गत गटारे, जलवाहिनीसाठी 22 कोटींचे कामे मंजुरी
नवी मुंबई : समस्यांचे ग्रहण लागलेल्या पनवेल सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये सुसज्ज रस्ते, अंतर्गत गटारे, पाईपलाईन यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. शासनाने येथील पायाभूत सुविधांची निर्मिती व विकास यो योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यानुसार 22 कोटी 31 लाख 51 हजार 500 रुपयांच्या खर्चास उद्योग विभागाने मान्यता दिली आहे.
पायाभुत सुविधा निर्मिती व विकास या योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तांवावर निर्णय घेताना मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने राज्यातील 10 सहकारी औद्योगिक वसाहतींचे प्रस्ताव मान्य केले असून, त्यात पनवेल वसाहतीचाही समावेश आहे. यासाठी 22 कोटी 31 लाख 51 हजार 500 रुपयांचा निधी मंजुर केला आहे. सदर संस्थेने त्यांच्या हिश्याची 25 टक्के रक्कम म्हणजेच 5 कोटी 57 लाख 87 हजार 875 रुपयांचे यापूर्वीच एमआयडीसीकडे जमा कली आहे. ही रक्कम भरल्यानंतरच सदर संस्थेच्या कामाकरीता प्रशासकीय मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव उद्योग संचालनालयाने शासनाकडे सादर केला आहे. एमआयडीसीने संस्थेच्या प्रस्तावाची छाननी करून पाहणी केल्यानंतर त्यास तांत्रिक मान्यता दिली आहे. त्यानंतर उद्योग विभागाने पनवेल सहकारी औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव मान्य केला आहे.
या निधीतून या औद्योगिक वसाहतीत 17 कोटी 70 लाख 66 हजार 300 रुपये खर्चाचे रस्ते, दोन कोटी 96 लाख 27 हजार 300 रुपये खर्चून अंतर्गत गटारे आणि पाणीटंचाई दूर करण्यासाठी एक कोटी 64 लाख 57 हजार 900 रुपये खर्चून जलकुंभ जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. असे एकूण 22 कोटी 31 लाख 51 हजार 500 रुपयांच्या कामाचे अंदाजपत्रक एमआयडीसीने सादर केले आहे. यापुढील कार्यवाही एमआयडीसीच करणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस