निलेश लंके यांचा राजीनामा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 30, 2024
- 1103
मुंबई : निलेश लंके यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. निलेश लंके हे पारनेरचे आमदार आहेत. आमदार निलेश लंके राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश करमार अशी चर्चा सुरु होती. कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.
यावेळी निलेश लंके यांनी दक्षिण अहमदनगर लोकसभेच्या खासदारांनी काय काम केलं? असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला उत्तरेला, केंद्र आणि राज्याच्या योजना उत्तरेला मिळाल्या. आमच्या भोळ्याभाबड्या लोकांनी खासदारांना मतदान केलं, पण जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत निधी देण्याची वेळ आली की, पारनेरला सापत्नपणाची वागणूक दिली गेली. आता या सर्वांचा हिशोब आगामी निवडणूक करणार आहोत, असं आव्हान निलेश लंके यांनी दिले.
आमदारकीचा राजीनामा देण्यावर लंके म्हणाले की, लोकसभेची निवडणूक लढविताना विरोधकांकडून आपल्याला अडचणीत आणलं जाऊ शकलं असतं. विरोधकांकडे वकिलांची फौज आहे. त्यामुळं पुढं जाऊन काही अडचण होऊ नये, म्हणून मी राजीनामा दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai