Breaking News
नवी मुंबई ः महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
माहे डिसेंबर महिन्याचा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि. 04 डिसेंबर 2023 रोजी होणार असून निवेदनकर्त्यांनी आपला अर्ज विहित नमुन्यात दोन प्रतीं मध्ये दि. 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे “लोकशाही दिनाकरिता अर्ज” असे अर्जाच्या वरील दर्शनीभागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे.
सदर अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे. अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयावर असावा. अर्जदाराने संबंधित विषयाबाबत या आधी विभाग कार्यालय, विभाग प्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे. थेट लोकशाही दिनात अर्ज सादर करण्यात येऊ नये. या शिवाय लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व / अपिल, सेवा विषयकआस्थापना विषयकबाबी या बाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी. त्याच प्रमाणे विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यकत्या कागदपत्रांच्या प्रतीन जोडलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत. तसेच तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर आणि या पूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याची ही नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.
लोकशाही दिनाकरिता करावयाच्या अर्जाचा विहितनमुना नागरिकांसाठी महानगरपालिकानूतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से. 15 ए, किल्ले गांवठाण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथे विनामूल्य उपलब्ध असून नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेत स्थळावरील डाऊनलोड आयकॉन वरून अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai