राज्यात थंडीची चाहुल
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 18, 2023
- 897
मुंबई : राज्यात किमान तापमानाचा पारा 14 ते 15 अंशांपर्यंत खाली उतरला आहे. त्यामुळे गारठा जाणवत आहे. मात्र हा पारा अजूनही आत्ताच्या सरासरी किमान तापमानापेक्षा अधिक आहे. उत्तर भारतात पश्चिम हिमालयीन क्षेत्रामध्ये पश्चिमी प्रकोपामुळे रविवारपासून राज्यात थंडी जाणवायला लागेल अशी शक्यता आहे.
शुक्रवारपासून महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत किमान तापमानात काहीशा घसरणीची व हळूहळू थंडीची चाहूल लागण्याची शक्यता असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. 19 नोव्हेंबरपासून उत्तर भारतात पश्चिमी प्रकोपाची आणि त्यामुळे पाऊस व बर्फवृष्टीची शक्यता आहे. या प्रभावाखाली महाराष्ट्रामध्ये थंडी जाणवण्याची शक्यता आहे.
सध्याच्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये 22 नोव्हेंबरपर्यंत किमान तापमानाचा पारा फार खाली उतरण्याची शक्यता नाही. मुंबई आणि महामुंबई परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि वनक्षेत्राच्या परिसरामध्ये पहाटेच्या तापमानात काहीशी घट जाणवत आहे. मात्र त्या पलीकडे मुंबईला फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही. 20 नोव्हेंबरपर्यंत मुंबईचे किमान तापमान 24 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी किमान तापमान 22 अंशांपर्यंत खाली उतरू शकते. मात्र या कालावधीत कमाल तापमानाचा पारा 35 ते 36 अंशांदरम्यान असेल.
कमाल तापमानात सध्या तरी मुंबई व उपनगरांना दिलासा मिळण्याची शक्यता नाही. मात्र, बंगालच्या उपसागरात असलेल्या प्रणालीचे चक्रीवादळात रूपांतर झाल्यानंतर 19 ते 23 नोव्हेंबरदरम्यान कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत वातावरण काहीसे ढगाळलेले असेल. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान कमी होऊ शकते.
- कोकण विभागात 33 ते 35 अंशांदरम्यान पारा
राज्यात केवळ कोकण विभागात सध्या किमान तापमानाचा पारा 20 अंशांपलीकडे नोंदला जात आहे. उर्वरित राज्यात पहाटेचे वातावरण सुखद आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे 13.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुणे, नगर, जळगाव, नाशिक येथे किमान तापमान 15 अंशांच्या खाली उतरले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai