Breaking News
भाव किंचित वधारले : तयार पदार्थ खरेदी करण्याकडे भर
नवी मुंबई : काही दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. अशातच गृहिणींची दिवाळी फराळ बनविण्यासाठी धावपळ सुरू आहे. परंतु नोकरीमुळे व्यस्त जीवनशैली असणाऱ्या महिलांची मात्र तयार फराळांना पसंती मिळत आहे. अन्नधान्यांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम रेडिमेट फराळांच्या किमतींवर झाला असून त्यांचे भाव किंचित वाढले आहेत.
पूर्वीच्या काळी महिलांचा दिवाळी फराळ घरीच बनविण्याकडे कल होता. परंतु आत्ताच्या काळात नोकरीनिमित्त महिला घराबाहेर पडतात. दिवसभर प्रवास व काम यामध्ये व्यस्त असल्यामुळे इच्छा असूनही त्यांना दिवाळी फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत नसतो. त्यामुळे काही वर्षांपासून तयार फराळांची मागणी वाढली आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी या रेडिमेट फराळाची विक्री होत असते. विश्वासार्हता आणि चव यामुळे घरगुती दिवाळी (पान 7 वर)
फराळ खरेदी करण्याकडे नोकरदार महिलांचा कल अधिक असतो. बचत गटाच्या माध्यमातूनही अनेक महिला दिवाळी फराळाची मागणी पूर्ण करत असतात. घरगुती फराळ तयार करणाऱ्या व्यावसायिकांकडून चकली, शंकरपाळी, करंजी, अनारसे, चिवडा इत्यादी पदार्थ घेणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. अनेक जण हे घरगुती पदार्थ परदेशातील नातेवाईकांकडे दिवाळीपर्यंत पोहोच करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही अन्नधान्यांच्या किमतीत वाढ झाल्याने तयार फराळाचे भाव वधारले असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
तयार फराळांचे भाव
धान्य व इतर वस्तूंच्या किमती वाढल्याने घरगुती फराळाचे भाव काहीसे वाढले आहेत. बाजारात तयार घरगुती फराळाला अधिक मागणी आहे. गुणवत्तेमुळे राज्याबरोबर परदेशातही आमच्या फराळाला पसंती मिळत आहे. - श्री फूड प्रॉडक्ट्स, वाशी
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai