कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 18, 2023
- 773
कोकण महसूल विभागाचे संकेतस्थळ सुरु
नवी मुंबई : महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम, विकास कामांचा आढावा घेणारी मासिक आढावा बैठक अप्पर मुख्य सचिव महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क डॉ. राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी कोकण महसूल विभागाच्या संकेतस्थळाचे देखील उद्घाटन करण्यात आले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील दालनात झालेल्या या बैठकीत कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर, मुंबई शहर,पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, इतर विभागांचे उपआयुक्त तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रमे, विकास कामांची सद्यस्थिती तसेच पुढील काळातील कामांचे विशेष नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कोकण भवनातील पहिल्या मजल्यावरील नुतनीकरण करण्यात आलेल्या महसूल शाखेचे अप्पर मुख्य सचिव महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क डॉ. राजगोपाल देवरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या कोकण महसूल विभागाच्या ुुु.वर्ळींलेाज्ञेपज्ञरप.ळप संकेतस्थळाचे देखील डॉ. राजगोपाल देवरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या संकेतस्थळावर महसूल विभागाचा इतिहास, कोकण विभागाची भौगोलीक स्थिती, ई-निविदा, परिपत्रके, बातमी पत्रके, महसूल विभागामार्फत सन 2015 ते 2017 या कालावधीत निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय आणि अधिसूचनांचे संकलन, महसूल विभागाशी संबंधित छायाचित्रे, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालये व संपूर्ण महसूल यंत्रणांचे संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत. तसेच कोकणातील पर्यटनाविषयीची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी या संकेतस्थळाला भेट देऊन महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन अप्पर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी यावेळी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai