Breaking News
नवी मुंबई ः बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून वाशी, सेक्टर-1 मधील साईबाबा मंदिराच्या बाजुला असलेल्या बी-टाईप येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 535 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
सदर महाआरोग्य तपासणी शिबिरासाठी लॉयन्स कल्ब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स आणि मयुरेश हॉस्पिटल-तुर्भे यांचे सहकार्य लाभले. सदर शिबिरामध्ये रक्तदाब, डायबेटीस, बीएमआय, ईसीजी, डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला, मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच मोफत औषधे, डाबर च्यवनप्राश आणि मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. वाशी येथील नागरिकांनी अशाच रितीने सहकार्य केल्यास लवकरच वाशी शहराचा विकास करणे सोपे होईल, असे आ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री तथा बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विकास सोरटे, ज्येष्ठ समाजसेविक जेम्स आवारे, पंचशीला तूपसमुद्रे, निधी भाटीया, आशा बाविस्कर, लक्ष्मी देवकर, विजया साळवे, अनिता शिंदे, वर्षा झरेकर, अस्मिता सावंत, वैशाली सावंत, संगीता चिकणे, राजा देवकर, संदेश साळवे, सन्नी सोनावणे, कुणाल चिकणे, लॉयन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रताप मुदलियार, डॉ. अनिकेत सोनावणे, संदीप सुर्यवंशी, रिना अग्रवाल, मोहन कालबेरे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai