Breaking News
गार्डनमधील कुंड्या मैदानात टाकल्या
वातावरणातील बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यावरण संतुलनाचे विविध प्रयोग केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून व्हर्टिकल गार्डनची संकल्पना पुढे आली आहे. नवी मुंबई पालिकेने या कामात पुढाकार घेऊन शहरातून वाहणाऱ्या नाल्यांवरच्या पुलांवर, एखाद्या फुटपाथवर, उद्यानाच्या भिंतीवर जाळी लावून त्यावर विशिष्ट प्रकारच्या झाडांच्या कुंड्या अडकवून व्हर्टिकल गार्डन अस्तित्वात आणले. या गार्डनची निर्मिती करुन लाखो रुपये खर्च करण्यात आले. या रोपांना व्यवस्थित सुर्यप्रकाश मिळले, पाणी मिळेल अशा स्वरुपात त्यांची निगा राखणे हे महत्वाचे असते. मात्र मोठा गाज वाजा करत पालिकेने अमंलात आणलेल्या या संकल्पनेतील कुंड्या गावस्कर मैदानात अस्ताव्यस्थ टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे या योजनेत हलगर्जीपणा करुन जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून हा खर्च वसूल करावा, या संकल्पनेवर किती खर्च केला याचा लेखाजोखा पालिकेने जाहीर करावा अशी मागणी सजग नागरीक मंचने केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai