Breaking News
यंदाही मुलींचीच बाजी तर कोकण विभाल अव्वल
मुंबई ः यंदा राज्याचा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्यातील 95 टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात. तर कोकण बोर्ड अव्वल आले आहे. राज्यात कोकण बोर्डाचा 97.51 टक्के तर मुंबईत सर्वात कमी 91.95 टक्के निकाल लागला. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्के निकाल अधिक लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. पत्रकार परिषदेत बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांच्या वतीनं नोंदणी करण्यात आलेली होती. बोर्डाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. 91.51 टक्क्यांसह कोकण विभाग अव्वल आले आहे. तर 91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.
विभागनिहाय निकाल
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai