Breaking News
शिंदेसेनेला अपात्र ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंची रणनिती
नवी मुंबई : भाजपला केंद्रात सरकार स्थापनेसाठी अपेक्षेएवढे बहुमत न मिळाल्याने मोदींनी शिंदेसेना, जदयू व टिडीपी च्या सहकार्याने सरकार स्थापनेचा दावा राष्ट्रपतींकडे केला आहे. याला प्रत्यूत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांनी 40 बंडखोर आमदार व शिवसेना नाव आणि चिन्ह याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका तातडीने सूनावणी घेण्यासाठी वकिलांच्या बैठका घेतल्याने मोदी सरकार या सर्वोच्च न्यायालयास्त्राला कसे सामोरे जाते हे ेपाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला 241 जागांवर समाधान मानावे लागले. बहुमतासाठी 31 जागा कमी पडत असून ही कमतरता एनडीए घटक पक्षाचे सहकारी तेलगू देसम पक्ष, जनता दल युनायटेड, शिवसेना (शिंदे गट) तसेच चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी यांना मिळालेल्या जनाधारातून बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. एनडीएच्या झालेल्या बैठकीत या चारही घटकपक्षांनी आपले समर्थन भाजपला दिल्याने मोदींचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
याउलट इंडिया गटाला लोकसभा निवडणुकीत 233 जागा प्राप्त झाल्या असून त्यांना महाराष्ट्रातील अपक्ष विशाल पाटील आणि राजस्थानातील भारत आदिवासी पक्षाचे समर्थन प्राप्त आहे. इंडिया आघाडीने तेलगू देसमचे 22 खासदार व जनता दल यूनायटेडचे 12 खासदार स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी आवश्यक ते संख्या बळ जमत नसल्याने त्यांनी वेट ॲण्ड वॉच ची भुमिका घेतली आहे. त्यातच शिंदे यांच्या शिवसेनेला घेरण्याची रणनिती उद्धव ठाकरे यांनी आखली असून सर्वोच्च न्यायालयात शिंदे आणि 40 बंडखोर आमदार यांच्या विरुद्ध प्रलंबित असलेली याचिका तातडीने सूनावणीसाठी वकीलांच्या बैठका घेतल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळत आहे. त्याचबरोबर केंद्रिय निवडणुक आयोगाने शिंदे यांना बहाल केलेले शिवसेना नाव व धनुष्यबाण याबाबतचीही प्रलंबित याचिका तातडीने सूनावणीसाठी घेण्याच्या सूचना ठाकरे यांनी केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. केंद्रिय निवडणुक आयोगाने शिंदे यांना शिवसेना पक्ष व चिन्ह देण्याचा दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यास विद्यमान शिवसेना खासदारांचे भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होवू शकते या अनुषंगाने ठाकरे व इंडिया आघाडीने रणनिती आखून मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र सोडण्याची तयारी केल्याचे सूत्रांकडून कळते. मोदी सरकार इंडिया आघाडीच्या रणनितीला कसे सामोरे जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai