Breaking News
71 खासदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला देश आणि जगभरातून 8000 निमंत्रित उपस्थित होते. रविवारी, 7 वाजून 15 मिनिटांनी मोदींसह प्रमुख सहकाऱ्यांचाही शपथविधी संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारमन यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा यात समावेश आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1952, 1957 आणि 1962 अशा तीन निवडणुकांमध्ये बहुमत गाठून सलग तीनदा पंतप्रधानपद भुषविले होते. त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत. सर्वात आधी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर तिसऱ्या क्रमांकावर अमित शाह यांनी शपथ घेतली. महाराष्ट्रातील बडे नेते नितीन गडकरी यांनी चौथ्या क्रमांकावर मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी जगभरातील दिग्गज लोक उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai