Breaking News
पनवेल ः केव्हायसी आणि काही तांत्रिक अडचणीच्या शर्यतीत अडकलेल्या पाच लाखांआतील ठेवीदारांना अखेर त्यांच्या परताव्याची रोकड प्राप्त झाली आहे. बुडीत कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या 237 ठेवीदारांना 63 लाखांची रक्कम वितरित कारण्यात आली आहे. यामुळे पनवेल संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
कर्नाळा बँकेतील आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर ठेवीदारांच्या विश्वासाचा हिमालय ढासळला होता. जिल्ह्यातील पेण अर्बन बँकेच्या 14 वर्षाच्या लढ्यानंतरही ठेवीदार उपेक्षित राहिल्याने कर्नाळा बँकेची वाटचाल तशीच होईल, अशी भीती ठेवीदारांना वाटत होती. मात्र आता कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना पाच लाखा आतील रक्कम परत मिळाली आहे. समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी याबाबत आरबीआयसह कर्नाळा बँक अवसायकासह बँक ऑफ बडोद्यासह सर्व पातळीवर पत्रव्यवहार केला. याबाबत खारघर येथील भूषण तोडेकर यांनी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्याकडे कैफियत मांडल्याने 237 ठेवीदारांच्या 63 कोटी रुपयांचा प्रश्न ऐरणीवर आला. कांतीलाल कडू यांनी बँक ऑफ बडोदाच्या ताडदेव शाखेशी पत्रव्यवहार करून त्या ठेवी परत मिळवून देणार असल्याचे घोषित करताच केव्हायसी आणि इतर तांत्रिक अडचणीत अडकलेल्या 236 ठेवीदारांची वाढ झाली. ती रक्कम वाढून एक कोटी सत्तावीस लाखांवर गेली आहे. अद्याप इतर ठेवीदारांच्या ठेवी एक दिवसा आड त्यांच्या बँक खात्यात परस्पर जमा होत आहेत. याशिवाय बँकेत पाच लाखांआतील अडकलेले ठेवीदार दररोज चार ते पाच जण पुढे येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी प्रविण म्हात्रे यांनी दिली आहे. पनवेल संघर्ष समितीच्या मोहिमेला यश येत असून पाच लाखांवरील ठेवीदारांचा लढाही अंतिम टप्यात असल्याचे कडू यांनी सांगितले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai