Breaking News
आ.मंदा म्हात्रे यांनी दिला 20 लाखांचा निधी
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून बेलापूर सेक्टर 15 येथे आमदार विकास निधी अंतर्गत रु. 20 लाख उपलब्ध करून नागरिकांकरिता निवारा शेड उपलबध करुन देण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन माजी भाजपा जिल्हाध्यक्ष सी.व्ही.रेड्डी यांची शुभहस्ते शुक्रवारी संपन्न झाले.
ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिलाांनी येथए सकाळी वॉर्क केल्यानंतर आराम करण्यासाठी एखादा निवारा शेड नसल्यामुळे गैरसोय होत होती. त्यामुळे तेथील नागरिक व महिलांच्या मागणी नुसार सदर ठिकाणी ‘निवारा शेड' उपलब्ध करून दिला असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. राज्यात लागलेल्या आचारसंहिता असल्यामुळे सदर उद्घाटन हे दोन महिने उशिराने झाले. तसेच माझ्या आमदार निधीमधून बांधण्यात आलेले असे अनेक समाजपयोगी विकास कामांचे उद्घाटन बाकी असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागे पर्यंत अनेक ठिकाणी उद्घाटनाचे उपक्रम हे सुरु राहणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. विनय तांबे, पांडुरंग कोळी, तुकाराम कोळी, चंद्रकांत कोळी, शैलजा पाटील, ज्योती पाटील, ज्ञानेश्वर कोळी, चंदकांत पाटील तसेच असंख्य ज्येष्ठ नागरिक, महिला व पत्रकार बांधव उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai