Breaking News
अर्धा पावसाळा सरला तरी पाणीसाठा निम्म्याहुन कमी
नवी मुंबई ः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरण क्षेत्रात हव्या त्या प्रमाणात पर्जनवृष्टी झाली नसल्याने पाणीसाठा वाढण्यास विलंब होत आहे. एकीकडे रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडून पुरजन्यस्थिती उद्धवत आहे तर दुसरीकडे मोरबेत मात्र पावसाचा जोर वाढलेला नाही. जुलै महिना अर्धा संपला तरी धरणात निम्म्याहुन कमी पाणीसाठा असल्याने नवी मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
नवी मुंबई महापालिकेला मोरबे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मोरबे धरणाची 450 दक्षलक्ष लिटर इतकी पाणीपुरवठ्याची क्षमता आहे. अद्याप मोरबे धरण क्षेत्रात यंदा हवा तेवढा पाऊन पडला नसल्याने शहरात नोडनुसार सुरु असलेली एक दिवस संध्याकाळची पाणीकपात सुरुच आहे. पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. धरण क्षेत्रात तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. सध्या मोरबे धरणक्षेत्रात फक्त 1539 मिमि पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रात 3,300 मिमी पावसाची गरज असते तरच नवी मुंबईला वर्षभर पाणी पुरवले जाऊ शकते. सध्या धरणात 94.612 दशलक्ष घनमीटर म्हणजे 41 टक्के पाणी शिल्लक आहे. धरण भरण्यासाठी 190.899 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असावा लागतो. सध्या धरणाची पाणीपातळी 76.70 मीटर झाली आहे. परंतु हे पाणी केवळ तीनच महिने पुरणर आहे. वर्षभर शहराची तान भागवण्यासाठी मोरबे पुर्ण क्षमतेने भरणे आवश्यक आहे. मोरबेची पाणीपातळी कमी झाल्याने कधीनव्हे ती शहरात आठवड्यातून तीन दिवस एक वेळ केलेली पाणीकपात ऐन पावसाळ्यातही सुरुच ठेवावी लागत आहे. जोपर्यंत धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडून धरण पुर्णक्षमतेने भरत नाही तोपर्यंत पाण्याचे योग्य नियोजन म्हणून पाणीकपातीचा सामना करावाच लागणार आहे. यासाठी दररोज दमदार पावसाने हजेरी लावली तर महिनाभरात पाणीपातळीत वाढ होईल असा विश्वास पालिकेला वाटत आहे.
याआधी जुन, जुलैमध्ये जोरदार पाऊस पडतो आणि ऑगस्ट च्या सुरुवातीलाच धरणातून विसर्ग सुरु होतो. मात्र यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यात जुनच जवळजवळ कोरडाच गेला. आता जुलैमध्ये थोडा पावसाने जोर धरला मात्र धरण क्षेत्रात हवीतशी पर्जनवृष्टी झालेली नाही.
आतापर्यंतचा पाणीसाठा
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai