"सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 20, 2024
- 675
हे पुस्तक आज युवकांना प्रेरणादायी ठरणारे- दशरथ भगत
नवी मुंबई ः आग्रोली गावातील सुधीर गोरखनाथ पाटील यांच्या "सार विचार" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या हस्ते अग्रोळी येथील कॉ. बि. टी. आर. भवन ग्रंथालय येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक हायस्कूलचे माजी प्राचार्य सन्माननीय सोनावणे सर होते. पांढरी टोपी प्रकाशन संस्थेने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या वेळी दशरथ भगत म्हणाले की, सार विचार हे पुस्तक आज युवकांना प्रेरणादायी ठरणारे आहे. मोठे ग्रंथ, पोथी वाचनण्यास आज कुणालाही वेळ नाही. धर्मग्रंथांच्या मंथनातून निघालेले सार या पुस्तकात आहे. आपण वाचन कला आत्मसात केल्यास भविष्यात काहीतरी जीवनात करू शकतो. त्यासाठी आजच्या युवकांना वाचन करणे गरजेचे असल्याचे भगत यांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक, कवी महेंद्र कोंडे म्हणाले की, छोटी छोटी वाक्यरचना हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. व. पु. काळे यांच्या वपूर्जा पुस्तकासारखं हे पुस्तक आहे. अशी माहिती तुमच्या आमच्या जीवनात सध्याच्या काळात मिळत नसल्याचे कोंडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनावणे यांनी हे पुस्तक प्रकाशन होत असलेली वास्तूची जागा सुधीर पाटील यांच्या आजोबांनी म्हणजेच हाशा माया पाटील यांनी ग्रंथालयासाठी दिली आहे. आज या वास्तू मध्ये त्यांचा मुलगा सुधीर पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशित होणे ही आग्रोळी ग्रामस्थांसाठी आनंदाची गोष्ट आहे.
प्रास्ताविकात सुधीर पाटील म्हणाले की, ‘सार विचार“ पुस्तकामध्ये अध्यात्मिक, ऐतिहासिक, निसर्ग, संसारिक, व चालु घडामोडी लिहिलेल्या आहेत. त्या वाचकांना उद्बोधक ठरणार असून भावी पिढीला एक प्रेरणादायी विचार देणाऱ्या ठरतील. सुरुवात ही माझ्या दैनंदिनी मध्ये लिखाण होते; मात्र मित्रपरिवाराकडून पुस्तकांची संकल्पना आली आणि आज पुस्तकंरूपाने आपल्या पुढे ठेवलं असल्याचे सुधीर पाटील यांनी सांगितले.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत,आग्रोळी गावातील ग्रामस्थ बाळकृष्ण म्हात्रे, अरुण डोंगरे, श्रावण म्हात्रे, राजेश पाटील, प्राध्यापक मारुती मल्लापूरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन म्हात्रे यांनी केले तर विनय उर्फ बंडू मोरे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. या वेळी आग्रोळी ग्रामस्थांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai