Breaking News
तातडीने भूमिपूजन करून बांधकामाला सुरुवात करण्याचे आदेश
नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी रेल्वेस्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवन प्रकल्पाचे गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मुंबई येथील विधिमंडळातील दालनात अंतरिम सादरीकरण करण्यात आले. यावेळी पवार यांनी महाराष्ट्र भवन संकल्पित चित्रामध्ये काही किंचित फेरबदल करून लवकरात लवकर भव्य-दिव्य असे महाराष्ट्र भवनाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून तातडीने भूमिपूजन करून बांधकामाला सुरुवात करावी, असे आदेश सिडकोला दिले आहेत.
वाशीमध्ये महाराष्ट्र भवन उभारावे यासाठी बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी 2014 पासून शासनासहसंबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रियेनंतर भुमिपुजन होऊन प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विधिमंडळातील दालनात महाराष्ट्र भवन प्रकल्पाचे अंतरिम सादरीकरण झाले. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक (1) शंतनू गोयल, मुख्य कार्यकारी अभियंता शीला करुणाकर, अधीक्षक अभियंता अर्जुन अनोसे, वास्तुविशारद हितेन शेट्टी, अभियंत्या तेजस्विनी पंडित व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. या वास्तूची निविदा प्रक्रिया ही येत्या सोमवारपर्यंत सुरू होणार असून लवकरच महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन होऊन बांधकामाला सुरुवात होणार आहे. यावेळी पवार यांनी महाराष्ट्र भवन संकल्पित चित्रामध्ये काही किंचित फेरबदल करून लवकरात लवकर भव्य-दिव्य असे महाराष्ट्र भवनाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून तातडीने भूमिपूजन करून बांधकामाला सुरुवात करावी, असे आदेश सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महाराष्ट्र भवनाची वास्तू 12 मजल्यांची असून, यामध्ये शयनगृहाच्या 11 खोल्या, अतिथीगृह दुहेरी शेअरिंगच्या 72, अतिथीगृह डबल बेडच्या 68 तसेच एक्झिक्युटिव्ह 10 अशा एकूण 161 खोल्या असणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधी सोबत येणारे त्यांचे वाहनचालक किंवा कर्मचाऱ्यांकरिताही खोल्या असणार आहेत. त्याचबरोबर ई लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, मिटिंग रूम, फूड प्लाझा, दुचाकी व चारचाकी वाहनतळ अशा अनेक विविध प्रकारच्या सर्व सुविधा या महाराष्ट्र भवनामध्ये पहावयास मिळणार आहेत. महाराष्ट्र भवनाचे प्रथमदर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा बैठी पुतळा असणार आहे.
महाराष्ट्र भवनासाठी 2014 पासूनच्या लढ्याला आता पूर्णविराम लागला असून या वास्तूचा फायदा हा नवी मुंबईलाच नव्हे पूर्ण महाराष्ट्र राज्याला होणार आहे. महाराष्ट्र भवनाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लावल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार तसेच सिडको व्यवस्थापकीय संचालकांचे आभारी आहे. - आमदार मंदाताई म्हात्रे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai