Breaking News
मुंबई ः छत्रपती संभाजीनगर विभागातील एका विद्यार्थिनीला 100 टक्के गुण मिळाले आहेत. 100 टक्के गुण मिळवलेली ही राज्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीला प्रत्यक्ष परीक्षेत 582 आणि क्रीडा गुण 18 असे एकूण 600 पैकी 600 गुण मिळाले आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
राज्य मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. राज्यातील 3 हजार 320 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. गोसावी म्हणाले, की वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनीने 100 टक्के गुण मिळवणे कौतुकास्पद आहे. खेळात केलेली मेहनत आणि अभ्यासातील सातत्य याचा परिणाम तिच्या निकालात दिसत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai