Breaking News
सायंकाळचा पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे आवाहन
नवी मुंबई : पावसाला सुरुवात झाली असली तरी हवातसा पाऊस अजून झालेला नाही. धरण क्षेत्रातही पाऊस पडलेला नाही. मोरबे धरणामध्ये 41 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे नवी मुंबई महापालिकेने प्रत्येक विभागात आठवड्यातून तीन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेला बेलापूर ते ऐरोलीपर्यंत मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये खारघर, कामोठे परिसरामध्येही मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यामध्ये पाणी बचत करता यावी, यासाठी प्रत्येक विभागात आठवड्यातून दोन दिवस सायंकाळी पाणी कपात सुरू केली होती. रोज सकाळी नियमित पाणीपुरवठा केला जात होता. सद्य:स्थितीमध्ये धरणामध्ये 41 दिवस पुरेल एवढे पाणी आहे. पाऊस पडला नाही तरी 25 जुलैपर्यंत शहरवासीयांना पाणी पुरविणे शक्य आहे; परंतु खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळच्या पाणी कपातीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापुढे आठवड्यातून तीन दिवस सायंकाळी पाणीपुरवठा केला जाणार नाही.
पुरेसा पाऊस पडून धरणाची पातळी वाढत नाही तोपर्यंत उपलब्ध जलसाठा जपून वापरावा लागणार आहे. पाण्याची उधळपट्टी थांबवावी यासाठी सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. सकाळी पाणीपुरवठा नियमित होणार असून, सायंकाळी आठवड्यातून तीन दिवस कपात केली जाणार आहे. नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
विभागनिहाय सायंकाळच्या पाणीपुरवठा बंदचे वेळापत्रक
विभाग - पाणी बंदचा वार
मोरबे धरणातील पाणीसाठ्याचा तपशील
धरणातील गतवर्षाच्या तुलनेतील साठा
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai