खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


कोकण भवनमध्ये बायोमेट्रिक हजेरी कार्यान्वित

अलर्ट सिटिझन्स फोरमच्या पाठपुराव्याला यश 

मुंबई ः सातवा वेतन आयोग आणि 5 दिवसांचा आठवडा या सुविधांचा लाभ सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना देताना सरकारने सर्व कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी प्रणाली अनिवार्य केलेली आहे. मात्र कोरोना कालावधीपासून अनेक कार्यालयांनी हा नियम धाब्यावर बसवला होता. याप्रकरणी अलर्ट सिटिझन्स फोरमने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे कोकण भवनमधील कार्यालयात 1 मे पासून बायोमेट्रिक हजेरी सुरु झाली आहे.

कोकण भवन इमारतीत विक्रीकर खाते, जीएसटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जात पडताळणी विभाग, राज्य माहिती आयुक्त कोकण विभाग, वाहतूक विभाग या कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरीची सर्रासपणे प्रतारणा होताना दिसत होते. सरकारच्याच नियमाचे सरकारी यंत्रणांकडून उल्लंघन होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने अलर्ट सिटिझन्स फोरमच्या वतीने कोकण विभागीय आयुक्तांकडे व मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवालय कक्षाकडे संलग्न कार्यालयात कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीची प्रत माहिती अधिकारात मागवली होती. परंतु, सदरील माहिती देण्यासाठी दोन्ही कार्यालयाच्या माहिती अधिकाऱ्याने टाळाटाळ केली होती. परंतु अलर्ट सिटिझन्स फोरमने प्रथम अपील दाखल केले. यावेळी सुनावणीच्या दरम्यान कोरोना कालावधी पासून सर्व बायोमेट्रिक मशिन्स बंद असून त्या लवकरच कार्यान्वित केल्या जातील असे सांगण्यात आले. सातत्याने केलेल्या पाठपुराव्या नंतर अखेर विभागीय आयुक्त कार्यालयाने बायोमेट्रिक मशिन्स बसवल्या व सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी नोंदवण्याचे आदेश पारित केले. त्या नुसार 1 मे पासून बायोमेट्रिक हजेरी सुरु झालेली आहे. प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे अलर्ट सिटिझन्सच्या वतीने सामान्य प्रशासन उपायुक्त मनोज रानडे, प्रथम अपिलीय अधिकारी तथा तहसीलदार श्वेता पवार आणि इमारत देखरेख अधिकारी तथा शासकीय माहिती अधिकारी माधुरी डोंगरे यांची सदिच्छा भेट घेतली व तुळशीचे रोप भेट देत आभार व्यक्त केले. फोरमच्या वतीने प्रातिनिधिक प्रतिनिधी मोहन वस्त, अरुण कागले, रमेश देशमुख, मोहन जाधव व सुधीर दाणी हे उपस्थित होते. भविष्यात सिडको, नवी मुंबई महानगरपालिका व कोकण भवन मधील उर्वरित कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी सुरु करण्यासाठी व सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांचे वेतन हे बायोमेट्रिक हजेरीशी जोडण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे मत फोरमच्या सदस्यांनी व्यक्त केले.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट